संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…

banner

चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी…

नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल आहिलयानगर.प्रतिनिधी.

आज कोरेगांव शहरातील संत नामदेव महाराज मार्गा वरील संत नामदेव महाराज मंदिर येथे शिंपी समाज बांधवाची मिटींग संपन्न झाली, यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष *मा. श्री भास्करराव टोम्पे साहेब,* राष्ट्रीय कार्याध्यक्ष *मा. श्री ईश्वरभाऊ धिरडे साहेब* राष्ट्रीय समन्वयक *मा. श्री अनंतभाऊ जांगजोड साहेब* *सौ. उषाताई पोरे, श्री दिनकरराव पंतगे, श्री महेशभाऊ मांढरे, पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक श्री संतोषभाऊ मुळे ना.स.प. सातारा जिल्हा अध्यक्ष सुनीलजी पोरे साहेब* व कोरेगांव शहरातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते, संत नामदेव शिंपी समाज कोरेगांव तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व या वेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले, नागपूर येथे होणाऱ्या शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात लाखो च्या संख्येत सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले, शिंपी समाजातील सर्व पोटजाती एकत्र करून सर्व शिंपी समाज संघटनाना बरोबर घेऊन 5 लाख समाज बांधवांचे अधिवेशन येत्या काही महिन्यांत नागपूर येथे घेण्यात येणार आहे, अधिवेशनात देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व इतर अतिथी प्रमुख पाहुणे असतील लवकरच अधिवेशनाची तारीख कळविली जाईल, तसेच समाज संघटित करून संत नामदेव महाराज यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार व शिंपी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या निकाली काढणार असल्याचे मा. अध्यक्ष महोदयांनी सांगीतले, यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नई दिल्ली या संघटनेच्या *प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी श्री योगेश मुळे* यांची निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले,

*संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…. चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी* हा नारा ह्या वेळी देण्यात आला, प्रस्तावना मा. श्री ईश्वरभाऊ धिरडे यांनी केली स्वागत श्री संदीपभाऊ धोंगडे व आभार श्री चंदनजी खटावकर यांनी मानले 🙏🙏🙏

नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल 

आहिलयानगर.प्रतिनिधी.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...