रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची चेन्नई सुपर किंग्जवर ५० धावांनी मात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची चेन्नई सुपर किंग्जवर ५० धावांनी मात

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची चेन्नई सुपर किंग्जवर ५० धावांनी मात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २८ मार्च २०२५ रोजी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे झालेल्या आठव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) दमदार कामगिरी करत पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांना ५० धावांनी पराभूत केले. या विजयासह आरसीबीने यंदाच्या मोसमातील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार रजत पाटीदार (५१ धावा, ३२ चेंडू) आणि फिल सॉल्ट (३२ धावा, १६ चेंडू) यांनी संघासाठी महत्त्वाच्या भागीदारी रचल्या. विराट कोहलीने (३१ धावा, ३० चेंडू) संथपणे खेळत संघाचा डाव सावरला. देवदत्त पड्डीकल (२७ धावा, १४ चेंडू) आणि टिम डेव्हिड (२२ धावा, ८ चेंडू) यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला २० षटकांत १९६/७ धावांपर्यंत पोहोचवले.
चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांत ३६ धावा देत ३ बळी मिळवले. मथीशा पथिराना (२/३६) तर सैयद खलील अहमद आणि रविचंद्रन आश्विन यांनीही एक-एक गडी बाद केले.
१९७ धावांचे कठीण आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्य धावांवर बाद झाला. यानंतर न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज रचिन रवींद्र (४१ धावा, ३१ चेंडू) आणि शिवम दुबे (१९ धावा, १५ चेंडू) यांनी काही काळ संघाचा डाव सावरला. मात्र, नियमित अंतराने गडी बाद होत राहिल्याने चेन्नईची स्थिती बिकट होत गेली. स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याने केवळ १९ चेंडूत २५ धावा करत डाव सावरण्याचे आणि गती मिळवून देण्याचे काम केले. अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनीने आपल्या जुन्या फॉर्मची झलक दाखवत १६ चेंडूत नाबाद ३० धावा फटकावल्या. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे चेन्नईचा डाव २० षटकांत १४६/८ वरच थांबला आणि आरसीबीने हा सामना ५० धावांनी जिंकला.
आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जोश हेजलवूड (३/२१), यश दयाल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत चेन्नईच्या फलंदाजांवर दडपण टाकले.
रजत पाटीदारने आपल्या शानदार फलंदाजीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ५१ धावा करत दमदार अर्धशतक साजरं केलं. त्याच्या खेळीमध्ये अचूक टायमिंग, दमदार स्ट्रोक्स आणि आत्मविश्वास झळकत होता. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला “सामनावीर” म्हणून गौरवण्यात आले.
या दणदणीत विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुणतक्त्यामध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. या मोसमात आरसीबीने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जला आपल्या पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

उद्याचा सामना:-
२९ मार्च २०२५ रोजी, आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी ७:३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे एक थरारक सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला विजय मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. तर क्रिकेटप्रेमींना या रोमांचक सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला