जबर मारहाण करून शेतमजुराचा दात पाडला दोषी पोलीसाने २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी मानवी हक्क आयोगाचा आदेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जबर मारहाण करून शेतमजुराचा दात पाडला
दोषी पोलीसाने २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी
मानवी हक्क आयोगाचा आदेश

मुंबई प्रतिनिधी :- निलेश रहाटे

पोलीस कर्मचाऱ्याने जबर मारहाण करून शेतमजूराचा दात पाडला. या प्रकरणी मानवी हक्काचे उलंघन झाल्याने दोषी पोलीस कर्मचाऱ्यास २५ हजाराचा दंड लावला असून ही दंडाची रक्कम भरपाई म्हणून पिडीत शेतमजूरास देण्याचे आदेश नुकतेच मानवी हक्क आयोग महाराष्ट्र (मुंबई) यांनी दिले आहेत. परंडा येथील मानवी हक्क कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शेख यांनी मानवी हक्क आयोगाकडे सदर प्रकरण दाखल केले होते. पोलीस अत्याचाराच्या विरोधात कायद्याचा आधार घेत चिकाटीने पाठपुरावा केला तर पिडीताला न्याय मिळतो. हेच या उदाहरणावरून दिसून येत आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, गंगाधर गुरमे (कोतवाड) रा. चवण हिप्परगा ता. देवणी जि. लातूर येथील शेतमजूराला देवणी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी हेड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी शेतीच्या वादात चार वर्षांपूर्वी लाठीने जबर प्रहार करून मारहाण केली होती. या मारहाणीत गंगाधर कोतवाड यांचा दात पडला होता. या विषयी टी. व्ही ९ वृत्त वाहिनीवर आलेल्या बातमीचा आधार घेत परंडा येथील मानव अधिकार कार्यकर्ते इकबाल शेख यांनी दि‌. १२ एप्रिल २०२१ रोजी मानवी हक्क आयोग मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावर पोलीस कर्मचारी रमेश कांबळे व लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाला दोषी ठरवत मानवी हक्क आयोगाने पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत २५,०००/- (पंचवीस हजार) रूपयांचा दंड लावला असून दंडाची रक्कम सहा आठवड्याच्या आत पिडीत शेतमजूराला देण्याचे आदेश दि. १२ मार्च २०२५ रोजी दिले आहेत.
या संबंधी अधिक माहिती देताना मानवी हक्क कार्यकर्ते इकबाल शेख यांनी सांगितले की, मारहाण झालेला पिडीत व्यक्ती गंगाधर गुरमे कोतवाड यांची माझी ओळखही नव्हती तसेच कसलेही संबंध नव्हते. परंतु, एका गरीब शेतमजूरास पोलीस निर्दयीपणे मारहाण करतात व त्यात त्याचा दात पडला ही बातमी वाचून मी अस्वस्थ झालो आणि मी पिडीतास न्याय मिळवून द्यायचा या हेतूने मानवी हक्क आयोगाकडे माझ्या स्वतःच्या खर्चाने तक्रार दाखल केली. अनेक वेळा सुनावणी व तारखांना उपस्थित राहिलो. या दरम्यान लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने खोटे व दिशाभूल करणारे रिपोर्ट सादर करून केस कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण, मी चिकाटीने व प्रामाणिकपणे लढाई लढून एका सामान्य शेतकरी शेतमजूराला न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरलो हेच खरे समाधान आहे.
या लढाईत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि ॲडव्होकेट शकील शेख (उच्च न्यायालय संभाजीनगर) यांचेही सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचा कृतज्ञापूर्वक उल्लेखही इकबाल शेख यांनी केला.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला