१७ एप्रिलला हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा; नवीन कार्यकारिणीची निवड व निवडणूक रणनितीवर भर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

१७ एप्रिलला हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा; नवीन कार्यकारिणीची निवड व निवडणूक रणनितीवर भर

श्रीरामपूरमध्ये होणाऱ्या मेळाव्यात राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती; रामसिंग बावरी यांच्यासह प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन

बातमी – नंदकुमार बागडेपाटील 
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवार, १७ एप्रिल २०२५ रोजी श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाची नवीन राज्य कार्यकारिणी निवडण्यात येणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणनिती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी दिली.

या महत्त्वाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष शितोळे, राज्य संघटक संतोष जगताप, सांगलीचे प्रदेश सरचिटणीस दीपक ढवळे आदींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

हिंदू एकता आंदोलनने गेली ३० वर्षे संघटना म्हणून कार्य केले असून त्याचेच रूपांतर पक्षामध्ये करण्यात आले आहे. समान नागरी कायद्यासारख्या मुद्द्यांवर सातत्याने आंदोलन करणाऱ्या या पक्षाने राज्यभरात हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासली आहे. राज्यातील युवा कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देत पक्ष विस्ताराचे धोरण राबवले जात आहे.

सध्या राज्यातील १२ जिल्ह्यांत व ४५ तालुक्यांत पक्षाचे संघटन कार्यरत आहे. येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे रामसिंग बावरी यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, अ‍ॅड. बाळासाहेब वाघमोडे (सांगली जिल्हाध्यक्ष – वकील संघटना), अ‍ॅड. दत्तोपंत काश्मिरे (प्रदेश सरचिटणीस), प्रसाद बावरी (नाशिक युवा अध्यक्ष), किशोर देशपांडे (दिंडोरी तालुकाध्यक्ष), मनोज घोडके (धुळे जिल्हाध्यक्ष), अनिल देवकर (जळगाव जिल्हाप्रमुख) यांच्यासह विविध जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याच्या यशासाठी श्रीरामपूर शहराध्यक्ष बी.एम. पवार, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, तालुकाप्रमुख शिवाजी फोफसे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनाश कनगरे, राहाता तालुकाध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, सोपानराव पागिरे (जिल्हा संघटक), नंदकुमार बगाडे (उपाध्यक्ष), रामदास सदाफळ (राहाता शहराध्यक्ष) परिश्रम घेत आहेत.

हॅशटॅग्स:
#HinduEktaAndolan #राज्यव्यापी_मेळावा #ShirampurNews #PoliticalUpdate #HindutvaPolitics #स्वराज्यसंस्था_निवडणुका

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...