१४ एप्रिल रोजी गुहागर आगारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
रा. प. गुहागर आगारामध्ये १४ एप्रिल २०२५ रोजी अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे
सदरचा जयंती महोत्सव सकाळी १०:०० वाजता रा. प. गुहागर आगारात संपन्न होणार असून या जयंती महोत्सवाला आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती रहाणार असून या जयंती महोत्सवाला आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी अभीवादन करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थितीत राहणार आहेत तरी या जयंती महोत्सवाला गुहागर तालुक्यातील सर्व नागरिकांनी व कर्मचारी यांनी वेळेवर बहूसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रा.प.आगारातील सर्व कर्मचारी यांनी केले आहे .यावेळी गुलामगिरी या पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे.
















