🟣 “एक आनंदी सेल्फी… आणि दोन मिनिटांत सगळं संपलं!”
तीन लेकरांसोबत पत्नीसह डॉ. प्रतीक जोशी यांचा लंडनला निघताना विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू
जयपूर / उदयपूर :
अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या दुर्घटनेने एका संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. प्रतीक जोशी, त्यांच्या पत्नी डॉ. कोनी व्यास आणि त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हे कुटुंब मोठ्या आनंदाने लंडनकडे रवाना झाले होते. विमानात घेतलेली सेल्फी ही त्यांची शेवटची आठवण ठरली.
डॉ. कोनी व्यास या उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती डॉ. प्रतीक जोशी २०१६ पासून लंडनमध्ये डॉक्टर म्हणून स्थायिक होते. त्यांनी त्यांच्या पत्नी व मुलांना सोबत घेण्यासाठी भारतात येऊन सर्व तयारी केली होती. डॉ. कोनी यांनी देखील लंडनला शिफ्ट होण्यासाठी नुकताच राजीनामा दिला होता.
गुरुवारी संपूर्ण कुटुंब लंडनकडे निघाले, पण नियतीला काही औरच मान्य होते. फ्लाइटमध्येच त्यांनी एक सेल्फी काढली आणि काही क्षणातच घडलेल्या अपघातात त्यांचा जीवनप्रवास संपला. या घटनेने बांसवाडा आणि उदयपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
तिन्ही मुले — प्रद्युत, मिराया आणि नकुल — देखील वडिलांसोबत विमान प्रवासासाठी अत्यंत आनंदी होती, असा भावनिक उल्लेख नातेवाइकांनी केला.
ही दुर्घटना केवळ एका कुटुंबाच्या आयुष्याचा नाही तर शेकडो स्वप्नांचा अखेर ठरली आहे.
🏷️ #VimanApghat #PratikJoshi #KoniVyas #LondonFlightCrash #RajasthanDoctorFamily #TragicEnd #AhmedabadToLondon #SelfieBeforeCrash
📸 फोटो

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.