पिंपळीखुर्द येथे ‘एक पेड मेरी माँ के नाम’ उपक्रमांतर्गत ५७ औषधी वृक्षांची लागवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟪 आईच्या नावे एक झाड…

banner

पिंपळीखुर्द येथे ‘एक पेड मेरी माँ के नाम’ उपक्रमांतर्गत ५७ औषधी वृक्षांची लागवड

👉 पर्यावरण रक्षणासाठी सुभाषराव चव्हाण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

📍 पिंपळीखुर्द, चिपळूण (प्रतिनिधी)

‘आई’ या शब्दातच प्रेम, माया आणि जीवनाची उब सामावलेली आहे. तिच्या स्मृतीला अथवा सन्मानाला समर्पित करत “एक पेड मेरी माँ के नाम” या भावनिक पर्यावरणीय उपक्रमाची सुरुवात रविवारी पिंपळीखुर्द येथे करण्यात आली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेने हा उपक्रम साकार झाला.

श्री केदारसुकाई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पार पडलेल्या या उपक्रमात कदंब, अर्जुन, वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, काजू, जांभुळ, चिंच, आवळा अशा ५७ औषधी व फलद्रुप वृक्षांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना सुभाषराव चव्हाण म्हणाले, “केंद्र शासनाने १४० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प देशवासीयांच्या हाती सोपवला आहे. आपण प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावल्यास भविष्यात आपल्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल. ही आपल्या मातेप्रतीची खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमात वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सौ. प्रियांका माने, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, सरपंच अंजली जांबुर्गे, व इतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे समन्वयन सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.

 

 

🔖 #एकपेडमेरीमाँकेनाम #पर्यावरणसंवर्धन #चिपळूण #वृक्षारोपण #सहकारमंच #वाशिष्ठीडेअरी #स

स्रोत: रत्नागिरी वार्ताहर

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...