स्वखर्चाने ग्रामस्थांची समस्या सोडवली!
साटवली बाणेवाडीतील गटार लाईनची निकृष्ट अवस्था संपवली; जगदीश जुलूम यांची लोकहिताची कृती
साटवली (लांजा तालुका) :
लांजा तालुक्यातील साटवली बाणेवाडी येथील रस्त्यावरील गटार लाईन अनेक वर्षांपासून अत्यंत निकृष्ट अवस्थेत होती. त्यामुळे पावसाळ्यात सड्यावरून वाहणारे पाणी थेट आजूबाजूच्या घरांमध्ये घुसत असे. परिणामी, ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान तर होतच होते, शिवाय घरातील अन्नधान्य देखील खराब होत होते.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना लांजा तालुका संपर्कप्रमुख तसेच डोंबिवली उपशहर प्रमुख (उभाटा गट) श्री. जगदीश जुलूम यांनी स्वखर्चातून चिरा बांधून गटार लाईनचे काम पूर्ण केले आहे. या कामामुळे आता पाण्याचा योग्य निचरा होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामस्थांनी श्री. जगदीश जुलूम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी देखील जुलूम यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी जपली होती.
















