हरवलेले ८५०० रुपयांचे पाकीट रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले
गुहागर च्या पराग भोसले यांचं होतंय अभिनंदन…..
शृंगारतळी | गुहागर वार्ताहर
गुहागर शहरातील रिक्षाचालक पराग कमलाकर भोसले यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गुहागर एसटी आगाराजवळील रिक्षा स्टँडजवळ त्यांना रस्त्यावर ८,५०० रुपयांचे पाकीट सापडले.
पाकीट उघडून पाहिल्यानंतर त्यांना त्यातील कागदपत्रांवरून हे पाकीट फिमी एजन्ट सलोनी शेखर विखारे यांचे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ योग्य चौकशी करून सलोनी विखारे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हे पाकीट परत केले.
सलोनी विखारे यांनी पराग भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांच्या या प्रामाणिक वागणुकीचे गुहागर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
रिक्षा चालक-मालक संघटना आणि सामाजिक संस्थांकडूनही पराग भोसले यांचा गौरव करण्यात आला आहे.
भोसले यांचा प्रमाणीपणा आणि प्रसंगरुप दाखवलेली समयसूचकता याचं ही कौतुक केले पाहिजे.
???? Hashtags
#गुहागर #प्रामाणिकरिक्षाचालक #HonestAutoDriver #LostAndFound #GoodDeeds #SocialGood #MaharashtraNews #MarathiNews #परागभोसले #SaloniVikhare #गुहागरबातमी #प्रेरणादायककथा #TrueHonesty #गुहागरसमाचार
✍️ लेखक: रत्नागिरी वार्ताहर















