ठाणे पोलीस भरती 2025 : 900 हून अधिक पदे रिक्त; सहा नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव, भरतीची तयारी सुरू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🟠 ठाणे पोलीस भरती 2025 : 900 हून अधिक पदे रिक्त; सहा नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव, भरतीची तयारी सुरू

१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी; ऑनलाईन अर्ज, शारीरिक व लेखी चाचणीद्वारे निवड प्रक्रीया

ठाणे (प्रतिनिधी) :

सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुमारे ९०० पदे रिक्त असून, यामध्ये २५० पदे जिल्हांतर्गत बदल्यांमुळे रिक्त झाल्याचे समजते. दरमहा मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत असल्याने आणि आंतरजिल्हा बदल्यांमुळे देखील रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अलीकडेच ३०० कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मात्र त्यांच्या जागी फक्त ५० नवीन कर्मचारीच ठाणे विभागाला मिळाले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांचा समावेश होतो. या संपूर्ण क्षेत्राची लोकसंख्या ६७ लाखांहून अधिक आहे. सध्या ३५ पोलीस ठाण्यांद्वारे कार्यवाही केली जाते. आयुक्तालयासाठी एकूण ९,००० पदे मंजूर असून यामध्ये ७५० अधिकारी, उर्वरित कर्मचारीवर्ग आहे.

🚨 सहा नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

ठाणे पोलीस आयुक्तालयात लवकरच सहा नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनपातळीवर पाठवण्यात आला आहे. एका पोलीस ठाण्यासाठी १२५ ते १५० कर्मचारी आवश्यक असल्याने, ही संपूर्ण भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरली जाणे अत्यावश्यक ठरणार आहे.

👮 Thane Police Bharti 2025 – पदांची माहिती

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई (Constable) महाराष्ट्र बोर्ड किंवा समकक्ष १२वी उत्तीर्ण

पोलीस शिपाई चालक (Driver Constable) १२वी उत्तीर्ण + वैध व्यावसायिक वाहन परवाना

🏃 शारीरिक पात्रता निकष (Physical Criteria)

🔹 पुरुष उमेदवारांसाठी:

100 मीटर धावणे

1600 मीटर धावणे

गोळाफेक (Shot Put)

🔹 महिला उमेदवारांसाठी:

100 मीटर धावणे

800 मीटर धावणे

गोळाफेक (Shot Put)

📝 निवड प्रक्रिया (Selection Process):

1. शारीरिक चाचणी (Physical Test)

2. लेखी परीक्षा (Written Exam)

3. चारित्र्य पडताळणी (Character Verification

4. वैद्यकीय चाचणी (Medical Examination)

💻 Thane Police Bharti 2025 – अर्ज कसा कराल?

भरतीसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी; अपूर्ण अर्ज अमान्य केले जातील.

आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करणे बंधनकारक आहे.

अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा – उशिराने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अधिकृत जाहिरात (PDF) वाचून अटी व शर्ती नीट समजून घ्या.

🌐 अधिकृत वेबसाईट भेट द्या

👉 https://www.mahapolice.gov.in

 

 

📌 Hashtags:

 

#ThanePoliceBharti2025 #PoliceBharti2025 #MaharashtraPolice #ThaneJobs #GovernmentJobs #12thPassJobs #पोलीसभरती2025 #ठाणेपोलीस #JobAlert #PoliceRecruitment #Mahapolice

 

 

 

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...