ॲड. विनेश वालम यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ मुंबई प्रदेश युवा अध्यक्षपदी निवड: विकासाची नवी दिशा!
मुंबई, [संदेश कदम]: बळीराज सेनेचे युवा नेते, निष्ठावान संघटक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. विनेश अशोक वालम यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ, मुंबई प्रदेशच्या युवा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ॲड. विनेश वालम यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ओबीसी युवकांच्या समस्या आणि मागण्या प्रभावीपणे मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीनंतर आमचे प्रतिनिधी नी संपर्क साधला असता, नवनिर्वाचित मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष ॲड. विनेश वालम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “सर्वांना सोबत घेऊन विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, या संधीबद्दल त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. ॲड. वालम यांच्या निवडीमुळे मुंबईतील ओबीसी चळवळीला नवसंजीवनी मिळेल आणि युवा वर्गाला योग्य दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
ही नियुक्ती केवळ ॲड. विनेश वालम यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेशात ओबीसी समाजाच्या विकासाची नवी पहाट उगवेल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
#राष्ट्रीयओबीसीमहासंघ #ॲडविनेशवालम #मुंबईयुवाअध्यक्ष #ओबीसीसमाज #राजकीयबातमी #महाराष्ट्र #युवानेतृत्व #विकासकामं #सामाजिककार्य