गुहागरजवळ एसटी बस घसरली: खरेकोंड येथे अपघात, प्रवासी सुखरूप
गुहागर (मंगेश जाधव, वेळबंकर)
काल, बुधवारी सकाळी गुहागर आगारातून सुटलेली पांगारी-हवेली-गुहागर ही एसटी बस तालुक्यातील खरेकोंड येथे एका वाहनाला साईड देत असताना रस्त्याच्या कडेला घसरली. या बसमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच एकूण ४० ते ४५ प्रवासी होते. सुदैवाने, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते निमुळते झाले आहेत आणि साईडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी आपली वाहने सावकाश आणि काळजीपूर्वक चालवावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
#Guhagar #BusAccident #Kharekhond #RainySeason #RoadSafety #एसटीबस #गुहागर #अपघात #पाऊस #रस्तेसु
रक्षा
















