📰 गुहागर~ पडवे जिप गटाला खिंडार, शिवसेना (UBT) गटातील असंख्य पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत प्रवेश…
नेत्रा ठाकुर शिवसेना ठाकरे गटातून बाहेर; आमदार भास्करराव जाधव यांना मोठा धक्का!

गुहागर ~ रत्नागिरीत ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांचा एकामागोमाग एक राजीनामा; शिंदे गटात होणार प्रवेश
पडवे ( सुजित सुर्वे,प्रतिनिधी): वेलणेश्वर जिल्हा परिषदेच्या ठाकरे गटातील प्रमुख महिला पदाधिकारी नेत्रा नवनीत ठाकुर यांनी आपल्या महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी UBT गटाच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा ताई आंबे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे.
तसेच दरम्यान गुहागर मधील पडवे येथील सरपंच मुझीब जांभारकर हयांनी देखील आज रत्नागिरी येथे मंत्री उदय सामंत यांचे उपस्थित शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला असून , त्यांनी पडवे मोहल्यातील भास्करशेठ जाधव यांचे खंदे समर्थक मुस्तर खळे, नजीर जांभारकर, यासीन टेमकर अमजद खळे, समिर खळे, अयाज खळे सह शेकडो कार्यकर्ते यांचा प्रवेश घडवून आणला.
पडवे जिल्हा परिषद शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आमदार भास्करराव जाधव यांच्यासाठी ही राजकीय घडामोड डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
दिनांक २७ जुलै रोजी हेदवी येथे होणार पक्ष प्रवेश
उद्या हेदवी येथे हि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते (वेळणेश्वर जि प.) हे पालक मंत्री उदय सामंत यांचे उपस्शित प्रवेश करणार असल्याचे समजते.
याचबरोबर वेलणेश्वर जिल्हा परिषद गटाचे ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख विलास वाघे व विभाग प्रमुख समीर डिंगणकर यांनी देखील आपापल्या पदाचा राजीनामा दिल्याची आणि तो तालुकाप्रमुख सचिव बाईत यांच्याकडे सुपूर्त केल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) मध्ये सुरू असलेली नाराजी आणि आंतरिक विसंवाद या घडामोडीमुळे पुन्हा एकदा उफाळून आले असून, शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—
🏷️ हॅशटॅग्स:
#Shivsena #NetraThakur #BhaskarJadhav #ShindeGroup #RatnagiriPolitics #PoliticalNews #गुहागरबातमी #रत्नागिरीवार्ताहर
—
📸 फोटो
















