वाटद-खंडाळा प्रबोधन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, एमआयडीसीवरील गैरसमज दूर
वाटद-खंडाळा येथे एमआयडीसी समर्थनार्थ भव्य जनप्रबोधन सभा संपन्न!
रत्नागिरी प्रतिनिधी – निलेश रहाटे
वाटद-खंडाळा परिसरात आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या “वाटद MIDC समर्थन जन प्रबोधन सभेला” नागरिकांचा मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपली एकजूट दाखवली.
या सभेला महिला, शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा तसेच इतर विविध घटकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे ही सभा विशेष लक्षवेधी ठरली.
सभेदरम्यान MIDC संदर्भातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमाची स्थिती दूर करण्यावर भर देण्यात आला. उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नागरिकांच्या शंका दूर केल्या व योजनांचे सकारात्मक पैलू समजावून सांगितले.
सभेचे संपूर्ण आयोजन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. “विचार नव बुझाव… विकास यश द्यावं…” या घोषवाक्याने वातावरण भारून टाकले.
विरोधकांनाही मंत्री सामंत यांनी स्पष्ट संदेश दिला की, “जर कोणतेही गैरसमज असतील तर चर्चेच्या माध्यमातून ते दूर करता येऊ शकतात. विरोधाऐवजी संवाद आणि वस्तुनिष्ठ चर्चा हाच लोकशाहीचा मार्ग आहे.”
ही सभा पंचक्रोशीतील विकास व संवादाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून पुढील काळातही असेच संवाद सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे ही सभा विशेष लक्षवेधी ठरली.
#वाटदखंडाळा #MIDC #जनप्रबोधनसभा #उदयसामंत #उद्योगमंत्री #महाराष्ट्रशासन #शेतकरी #व्यापारी #स्थानिकविकास #IndustrialDevelopment #Konkan #PublicMeeting #UdaySamant #Maharashtra
















