🏏 वानखेडेवर गावसकरांचा पुतळा; शरद पवार म्युझियमचंही उद्घाटन लवकरच!
सचिननंतर सुनील गावसकर यांचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर; MCA चा ऐतिहासिक निर्णय
📍 मुंबई (प्रतिनिधी) | रत्नागिरी वार्ताहर
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर आता अजून एका दिग्गज क्रिकेटपटूचा पुतळा तिथे उभा राहत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा पुतळा वानखेडे स्टेडियममधील नव्याने साकारल्या जाणाऱ्या “MCA शरद पवार क्रिकेट म्युझियम” मध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुतळ्याबरोबरच BCCI आणि MCA चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळा देखील याच संग्रहालयात उभारण्यात येणार असल्याचं MCA ने जाहीर केलं आहे. हे म्युझियम ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस क्रिकेट चाहत्यांसाठी खुले होणार आहे.
🗣️ गावसकर भावूक!
या सन्मानानंतर प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, “माझ्या मातृसंस्थेने मला हा सन्मान दिला यासाठी मी अत्यंत आभारी आहे. MCA मुळेच मला क्रिकेटमध्ये प्रवेश मिळाला आणि देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. माझा पुतळा म्युझियमच्या प्रवेशद्वारावर असणं, हा माझ्यासाठी अमूल्य गौरव आहे.”
🏛️ शरद पवार यांचेही योगदान अमूल्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे MCA, BCCI आणि ICC यांसारख्या संस्थांचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत MCA ने या संग्रहालयाला त्यांच्या नावाने ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “हे म्युझियम म्हणजे क्रिकेटमधील यश, नेतृत्व आणि दूरदृष्टी यांचं प्रतीक आहे.”
—
🔖 #SunilGavaskar #SharadPawar #WankhedeStadium #MCA #CricketMuseum #SachinTendulkarStatue #IndianCricketLegends #MumbaiCricketNews
📸 फोटो