कुणबी समाजाचे नियोजनबद्ध आंदोलन, रणनिती ठरली, ७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढत आंदोलनाला सुरुवात 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुणबी समाजाचे नियोजनबद्ध आंदोलन, रणनिती ठरली, ७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढत आंदोलनाला सुरुवात 

मुंबई – संदीप शेमणकर

बुधवार दि.‌१० सप्टेंबर रोजी परेल येथील संघ कार्यालयात झालेल्या बैठकीत दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आझाद मैदान येथे कुणबी समाजाचा मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे असा एकमुखी ठराव बैठकीत करण्यात आला.

यावेळी संघाध्यक्ष अनिलजी नवगणे यांनी आपल्या कार्यकारिणी सहित तालुक्यातील शाखांचे पदाधिकारी, संघ प्रतिनिधी, समाजाच्या इतर संघटना यांना नियोजन सभेला पाचारण केले होते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असून त्याची रणनीती ठरविण्यात आली.

संघाच्या वतीने समाजातील वकिलांना एकत्र घेऊन लवकरच मुंबई उच्च न्यायालयात शासनाने काढलेल्या जीआर विरोधात पिटीशन दाखल करुन दाद मागण्यात येणार आहे. तसेच शाखांतर्फे ग्रामीण व मुंबईत घरोघरी जाऊन आरक्षण बचाव करता व आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्याकरिता आंदोलन समिती स्थापन करण्यात आली.

संघाध्यक्ष अनिल नवघणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या आंदोलनात ओबीसी संघटनांच्या इतर समाज घटकांना देखील बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपस्थित संघाचे माजी अध्यक्ष ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांतजी बावकर त्याचप्रमाणे संघाचे उपाध्यक्ष श्री. म्हसकर, उदय कटे, अवधूत तोरस्कर, सरचिटणीस कृष्णा वने, खजिनदार महेश शिर्के, राजकीय संघटन समितीचे अशोक वालम, नवी मुंबईचे मा. उपमहापौर अविनाश लाड, माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, अरविंद डाफळे, पांडुरंगजी उपळकर, रविंद्र मटकर, अनिलजी भोवड, माधव कांबळे, प्रमोद खेराडे,ऍड सुभाष बाणे, ऍड महेंद्र मांवकर, ऍड मंगेश हुमणे व इतर अनेक समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात