शिवारात यंत्र, हाच संपन्न शेतीचा मुलमंत्र ~ शेतकऱ्यांनी कृषी समृध्दी योजनेचा लाभ घ्यावा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवारात यंत्र, हाच संपन्न शेतीचा मुलमंत्र ~ शेतकऱ्यांनी कृषी समृध्दी योजनेचा लाभ घ्यावा

👉 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले

*रत्नागिरी-* कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी समृध्दी योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर शेतकऱ्यांनी कृषी समृध्दी योजनेतील विविध योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

सुक्ष्म सिंचन सुविधा या बाबीमधून इलेक्ट्रीक मोटर पंप, डिझेल/पेट्रोल इंजिन, शेततळे, पाईप संच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन करीता अनुदान देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण – या बाबीमधून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप, भात कापणी यंत्र, कडबा कुट्टी, श्रेडर, वड चीपर, सपारी काढणी यंत्र इत्यादी यंत्र अवजारांना अनुदान मिळणार आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या बाबीमधून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रॅगन फ्रुट (Exotic Fruit Crop), पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीत्तोर व्यवस्थापन-फॉर्म गेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजु, आंबा आणि पणन सुविधा उ. बाबींकरीता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या बाबीमधून कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास १० हे. पर्यंत काजु, आंबा, नारळ, कोकम, फणस इ. फळपिकांना अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया या बाबीमधुन कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना ३० टक्के किंवा ५० लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी शेतावर विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्याकरीता आपला ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अग्रीस्टॅक फार्मर आयडी नसल्यास आपल्या नजिकच्या सोएससी सेंटर, सहाय्यक कृषि अधिकारी, ग्राम महसल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधून अग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा. सद्यःस्थितीमध्ये सन २०२५-२६ मध्ये जिल्हयामध्ये महाडीबीटी प्रणालीवर एकुण ५ हजार १७ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या बाबीसाठी निवड झालेली आहे. त्याकरीता १८.५७ रूपये कोटी इतका निधी खर्च होणार आहे या व्यतिरीक्त वरील योजनांसाठी रक्कम ७४ कोटी रूपये कृषि समृध्दी योजनेमधुन निधी रत्नागिरी जिल्हयासाठी प्राप्त होणार आहे.

संबंधितांनी काही शंका/अडचणी असल्यास ०२२-६१३१६४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता. योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी तालका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा. कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलप्रणाली विकसित केले आहे. ‘प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य’ या पध्दतीने शेतक-यांची निवड करण्यात येईल. आपण अर्ज केलेल्या यंत्र/अवजाराची आवश्यक कागदपत्र (उदा. दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र इ.) महाडीबीटी पोर्टलवर अग्रीस्टॅक फार्मर आयडीने लॉगीन करुन आपली निवड झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अपलोड करावेत. अन्यथा महाडिबीटी पोर्टलव्दारे आपला अर्ज रद्द करण्यात येवून आपण लाभापासून वंचित राहू शकता. शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हयातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात