सत्तेत आल्यावर सुद्धा लोकांची सतत कामे करणारा भाजपा पक्ष
~भाजपा जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे.
मुंबई ~ प्रविणभाऊ पवार
सिंदू रॅली ते अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी पासून पंतप्रधान मोदीजी वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आज आम्ही सत्तेत आल्यानंतर सुध्दा आम्ही आराम करणाऱ्यातील पक्ष नाही. सतत काम करणारा पक्ष आहे. सतत रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे. लोकांना न्याय देणार पक्ष आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ताला आरामाची सोय नसते. आज प्रत्येक पदाधिकारी काम करतो बुध प्रमुख पासून ते वरच्या पर्यंत काम करत असतात सध्या रोज अनेक कार्यक्रम होत राहणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता अभियान’ आमचे कार्यकर्ते दिवस रात्र लोकांच्या सेवेसाठी काम करत असतात. असे जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा प्रसंगी बोलल होते.
या कार्यक्रमाला उत्तर -मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, व्हॉकर व वॉकिंग स्टिकचे ५० दिव्यागांंना वाटप करण्यात आले. बीओस्टेड हाऊस, खेरनगर बांद्रा पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या. या प्रसंगी भाजपा एनजीओ मुंबईचे अध्यक्ष हेमांग जागेला म्हणाले की, आम्ही मोदीजींच्या जन्मदिनानिमित्त आम्ही लोकांची सेवा करतो. मोदीजीनी आज एक महत्वाचं काम केलं आहे. ते म्हणजे यापुढे हॅंडीकॅपनां बोलायचे नाही. विकलांग बोलायचं आहे. विकलांग म्हणजे दिव्य अंग, मोदींजीनी या भावना जागृत सर्वांच्या मनात जागरूक केलेल्या आहेत. मुंबई चिटणीस महेश पारकर, मा. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी पण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव रुपेश मालूसरे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा सचिव प्रसाद मरगज यांनी केले. याप्रसंगी जिल्हा तालुका व वाॅर्ड मधिल पदाधिकारी उपस्थित होते.















