रत्नागिरी तालुक्यातील जयगड- हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुक्यातील जयगड- हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा – श्री प्रथमेश गोपाळ गावणकर ( अध्यक्ष खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था)

निलेश रहाटे :- रत्नागिरी प्रतिनिधी

मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पहायला मिळत आहे.*प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे हे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप जयगड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रथमेश गावणकर यांनी केला आहे.* साधारणतः 2005 पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरवात झाली.सुरवातीला या दोन्ही पोर्ट ची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता मात्र मागील 10 वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीला सुरुवात झाली. तुलनेने रस्ता जसा आहे तसाच आहे.

रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक,खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे.

यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसण्यात येत नाही.

अगदीच या आठवड्यात हातखंबा मध्ये एक भीषण अपघात झाला यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला.अनेक जण त्यामधे जखमी आहेत. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांन मध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.

या रस्त्यावर अनेक शाळा , महाविद्यालये देखील आहेत त्यामुळे या शाळेत महाविद्यालया मध्ये येणारे पालक देखील चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते.एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

या सर्व गोष्टी समोर ठेवून येत्या काही दिवसात या परिसरात स्थानिक नागरिकांच्या रोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज उपविभागीय अधिकारी रत्नागिरी श्री जीवन देसाई साहेब यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नायब तहसीलदार सौ श्रुती सावंत मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही,उपयोजना झाली नाही तर या तालुक्यातील जनता आपल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी हजारोंच्या संख्येने रस्तावर उतरेल व जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या रस्तावर कोणतीही मालवाहतूक होणार नाही.आणि याला जबादार प्रशासनातील संबंधित विभाग असतील.दिवसा ढवळ्या रस्त्यावर कीड्या मुंग्यांसारखे चिरडून मारण्या इतके जीवन स्वस्त नाही.असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला आज या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात