वेळणेश्वर येथे दुर्गादेवीचा नवरात्रौत्सव 5 दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेळणेश्वर येथे दुर्गादेवीचा नवरात्रौत्सव 5 दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर या मंडळाचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांचे भव्य पटांगणात वेळणेश्वर बाजारपेठ येथे दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 ते शुक्रवार दिनांक 03 सप्टेंबर 2025 अशा 5 दिवसात विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार असून गुहागर तालुक्यातील भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान श्री. स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर व ग्रामस्थ मंडळ वेळणेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
रविवार दिनांक 28 /09/2025 रोजी दुपारी 03:00 वाजता श्री दुर्गादेवी मातेचे मिरवणुकीने आगमन त्यानंतर सोमवार दिनांक
29/0 9 /2025 रोजी सकाळी 09:00 वाजता श्री दुर्गादेवी मातेची प्राणप्रतिष्ठापणा होणार असून त्यानंतर पूजा व आरती कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी 07:00 वाजता श्री. माऊली महिला भजन मंडळ जानवळे मंडळाच्या बुवा सौ. जान्हवी विखारे यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.त्यानंतर रात्रौ 08:30 वाजता महाआरती व रात्रौ 09:30 फनी गेम्स कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
मंगळवार दिनांक 30 /09 /2025 रोजी सकाळी 07:00 वाजता रत्नागिरी येथील श्री.नवलाई महिला भजन मंडळ नाचणे या मंडळाच्या बुवा सौ. सर्वथा चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर रात्रौ 08:30 वाजता श्री. लक्ष्मीनारायण भजन मंडळ हेदवी यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर आरती घेण्यात येईल. रात्रौ 09:30 वाजता फणी गेम्स आयोजित करण्यात आलेला आहे.
बुधवार दिनांक 01/ 10/ 2025 रोजी सकाळी 07:00 वाजता श्री.दुर्गादेवी मातेची पूजा व आरती कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यानंतर सायंकाळी 07:00 वाजता गुहागर खालचापाट येथील स्वर साधना भजन मंडळ बुवा आदिती धनावडे यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्रौ 08:30 वाजता महाआरती घेण्यात येणार आहे. त्यानंतर रात्रौ 09:30 वाजता गुहागर तालुक्यातील शारदादेवी नृत्य कलापथक असगोली वरचीवाडी शक्तीवाले शाहीर श्री. प्रमोद घुमे यांच्या विरुद्ध गुहागर तालुक्यातील मुंढर येथील तुरेवाले शाहीर विनोद गावडे सह दिनेश सुतार यांचा जबरदस्त डबलबारी नाचाचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे.
गुरुवार दिनांक 02 /10/ 2025 रोजी सकाळी 07:00 वाजता श्री. दुर्गादेवी मातेची पूजा त्यानंतर सकाळी 09:00 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुपारी 03:00 वाजता माता-भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आलेले आहे.त्यानंतर रात्रौ 08:30 वाजता महाआरती होणार असून रात्रौ 10:00 दांडिया रास खेळण्यात येणार असून वाजता लहान गटात,मोठ्या गटात खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
शुक्रवार दिनांक 03/10/2025 रोजी सकाळी 07:00 वाजता दुर्गादेवी मातेची पूजा त्यानंतर दुपारी 12:00 वाजता महाआरती घेण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता मिरवणुकीने श्री. दुर्गादेवी मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात