मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर रोजी जानवळे येथे वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर रोजी जानवळे येथे वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता वर्षावासातील प्रवचन मालिका सांगता समारोप आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील बौद्ध बंधू – भगिनी, उपासक, उपासिका तसेच तालुक्यातील,विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे अध्यक्ष सुरेश(दादा) सावंत, कार्याध्यक्ष एम.डी. मोहिते, सचिव सुनील गमरे, अंतर्गत धार्मिक संस्कार समिती अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुनील जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

बुद्ध धम्मात वर्षावासाला फार मोठे महत्त्व असून अडीच हजार वर्षा पूर्वी पासून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पासून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी बौद्ध भन्ते, बौद्ध भिक्कू यांना पावसाळी तीन – चार महिने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रचार करताना फार मोठे अडथळे यायचे त्यामुळे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास म्हणजेच वर्षावास एका ठिकाणी राहून बौद्ध भिकू बौद्ध भंते हे पावसाळ्यात तीन – चार महिने आपले आलेले अनुभव कथन करत असत आणि एकत्र राहत असत, एकत्र वास्तव्य करत असत त्यालाच वर्षावास असे म्हणतात या वर्षावासाचा सांगता समारोप गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात वर्षावास प्रवचन मालिका आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा चालू होती या प्रवचन मालिकेचा सांगता समारोप मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे

मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता

धम्म पूजा पाठ होईल त्यानंतर सकाळी 10:30 वाजता बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे अंतर्गत हिशोब तपासणीस अविनाश शिवराम कदम यांचे बुद्ध धम्म या विषयावर धम्म प्रवचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मान्यवरांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12:00 वाजता मान्यवरांचे मनोगत व चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी 02:00 वाजता उपस्थित सर्वांना भोजनदान ठेवण्यात आलेल्या आहे. तरी गुहागर तालुक्यातील बौद्ध बंधू भगिनी उपासक उपासिका तसेच धम्म संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला वेळे त बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात