गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मिडीयम व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुलमध्ये कलासंचनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मिडीयम व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुलमध्ये कलासंचनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात संपन्न

तालुक्यातून केंद्रावर एलिमेंटरी व इंटरमिजिएट साठी सहभागी विद्यार्थ्यांची परीक्षा उत्साहात संपन्न 

 

चिपळूण (योगेश पेढांबकर):

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला- संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित एलिमेंटी डॉर्डग रोड परीक्षा व इंटरमिजिएट डॉडंग रोड परीक्षा सन २०२५ मध्ये कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत आयोजन केले असून चिपळूण येथील नामवंत विद्यालय गोवळकोट एज्युकेशन झोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल या वि‌द्यालयातील केंद्रावर संपन्न होत आहे.

या केंद्रावर शासकीय रेखाकला परीक्षेसाठी एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षा या परीक्षेसाठी वि‌द्यार्थी तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी वि‌द्यार्थी असे एकूण ५३० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले आहेत. सर्व वि‌द्यार्थ्यांचे बैठकव्यवस्था एकूण १६ वर्गखोलीमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा व खातून वि‌द्यालय, गोवळकोट, परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण, इंग्लिश मीडियम प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल, गोवळकोट महाराष्ट्र हायस्कूल, चिपळूण हाजी दाऊद आमीन हायस्कूल, कालूस्ते, तालुका वसंतराव भागवत माध्यमिक वि‌द्यालय, मार्गताम्हणे, इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम सुरैया खानम प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ.एम. क्यू. दळवी वाघिवरे उर्दू हायस्कूल, वाधिवरे, कै. शिवरामशेठ लांजेकर माध्य. विद्या. कळमुंडी आदी शाळांचा सहभाग होता. या केंद्रावरती केंद्र संचालक म्हणून वि‌द्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनी काम पाहिले आहे. तर संपूर्ण या शासकीय रेखाकला परीक्षेचे केंद्रावरचे बैठक व्यवस्था ते संपूर्ण परीक्षा नियोजन प्रमुख म्हणून वि‌द्यालयाचे कलाशिक्षक श्री. उदय मांडे यांनी केले आहे. यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अतिशय अचूक नीटनेटके या केंद्रावरील नियोजनमुळे सदर परीक्षा उत्तमरित्या व शांततेत संपन्न झाली.एलिमेंटरी या परीक्षेसाठी वस्तूचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, नक्षीकाम, कर्तव्यभूमिती अक्षरलेखन हे विषय आहेत. इयत्ता दहावीच्या एस.सी. सी. बोर्ड परीक्षेमध्ये सदर परीक्षांचे गुणांकन ग्राह्य धरीत असल्याने यावर्षी परीक्षेकडे वाढता कल दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या परीक्षांची उपयुक्तता केवळ कलाशिक्षणापूर्तीच मर्यादित नसून बदलत्या आधुनिक व युगात सर्जनशील आणि सृजनात्मक निर्मिती करता उपयुक्त ठरते. त्यामुळे तांत्रिक आणि तत्सम इतर क्षेत्रातील व्यावसायिक वृत्तीला सौंदर्य संवेदनाची जोड मिळून कौशल्य आत्मसात केल्यामुळे तांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रम, अंतर्गत सजावट गृह ड्रेस डिझाईनिंग, ड्राफ्ट्समन, सर्वेअर, उपयोजित कला प्रवेशासाठी व जीवनात इतर विषय अंगी बानवणाऱ्या वि‌द्यार्थ्यांना रेखाकला परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. म्हणूनच शासन स्तरावर या परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.

या शासकीय चित्रकला परीक्षेसाठी केंद्रावरील नियोजन प्रमुख व गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलचे कलाशिक्षक श्री. उदय मांडे, तालुक्यातील विद्यालयातील कलाशिक्षक श्री. परांजपे हायस्कूल चिपळूण विद्यालायचे कलाशिक्षक श्री. अरुण शिगवण, वसंतराव भागवत माध्यमिक वि‌द्यालय, मार्गताम्हाने या वि‌द्यालयाचे कलाशिक्षक श्री. सुशील कुमार कुंभार, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, मिरजोळी कलाशिक्षक श्री. सुधाकर रेडीज, महाराष्ट्र हायस्कुल कलाशिक्षक श्री. वली खान, एस.पी.एम कलाशिक्षक सौ. बुद्रुक, हाजी दाऊद आमीन हायस्कुल कलाशिक्षक श्री. अजित मते आदी शिक्षक यांनी काम पाहिले.

एकंदरीत महाराष्ट्र राज्य आयोजित एलिमेंटी डॉर्डग रोड परीक्षा व इंटरमिजिएट डॉडंग रोड परीक्षा उत्साहात संपन्न झाली.

 

*फोटो क्रमांक- १*

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या केंद्रावर पार पडताना एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉइंग रोड परीक्षा या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले विद्यार्थी दिसत आहेत.व शिक्षक आदी दिसत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात