डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करणे काळाची गरज – केंद्रीय शिक्षक विजय कांबळे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करणे काळाची गरज – केंद्रीय शिक्षक विजय कांबळे


गुहागर ~ राज पवार ( मासू ) : त्रिरत्न शैक्षणिक प्रगती मंडळ मासू मुंबई आणि स्थानिक यांच्या विद्यमाने ‘ त्रिरत्न बुद्ध विहार ‘ मासू येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्ममय वातावरणात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे त्रिरत्न शैक्षणिक प्रगती मंडळ मुंबईचे सेक्रेटरी नितीन पवार होते. धम्म ध्वजारोहण करून मासू गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोज पवार यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला.यावेळी सर्व उपासक आणि उपासिका शुभ वस्त्रात उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य, श्रामणेर,केंद्रीय शिक्षक,प्रवचनकार विजय कांबळे गुरुजी यांची मुख्य उपस्थिती होती. बौद्धाचार्य सचिन पवार यांच्या सुरेख आवाजात धम्मविधी संपन्न झाली.यावेळी अष्टांगिक महिला मंडळ मासू स्थानिक आणि एकात्मता महिला मंडळ मुंबई यांच्या सर्व कार्यकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रवचनकार विजय कांबळे गुरुजी आपल्या प्रवचनात बोलताना ”
तीन धम्मक्रांती कशाप्रकारे झाल्या आणि जगातील पहिली धम्मक्रांती तथागत भगवान बुद्ध यांनी कशी केली याबद्दल माहिती दिली. आपले राजवैभव सोडून, सुख सोडुन दुःखाचे मूळ शोधण्यासाठी गृहत्याग केला.हे भिक्कुनो जगभरात भ्रमण करा माझा समानतेचा, समतेचा धम्म प्रत्येक माणसा पर्यंत पोहचवा.माझ्या धम्माचा प्रारंभ गोड, मध्यान्ह गोड आणि अंत ही गोड आहे. त्रिपीटक मध्ये आपल्या धम्माची सर्व माहिती जतन करून ठेवली आहे.पहिली धमक्रांती बुद्धांनी केली त्यावेळी आपल्या धम्माचे संरक्षण आणि प्रचार करण्याचे महान कार्य अजातशत्रू, आणि वैशालीचा राजा काल अशोक यांनी केले. ८२ सुत्तपिटक – बुद्धांच्या मुखातून आलेले सुत्त आणि २००० सुत्त भगवान गौतम बुद्धांवर विद्वान भिक्खूनी गौरविलेले त्याला ” गाथा ” बोलतात. सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. आपल्या मुलांना त्याने धम्म प्रचारासाठी जगभर पाठविले.लाखो शिलालेख कोरून अशोकाने धम्मप्रसार केला. दुसरी धम्मक्रांती सम्राट अशोकाने केली आणि तिसरी धम्मक्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली म्हणजे जगातील रक्ताचा एक ही थेंब न सांडता बाबासाहेबांनी तिसरी धम्मक्रांती घडवून आणली असे प्रतिपादन विजय कांबळे गुरुजी यांनी केले.
धम्मचक्र प्रवर्तनदिनी त्रिरत्न शैक्षणिक प्रगती मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार, संदेशवाहक सूचित पवार,आणि स्थानिक मंडळाचे सचिव दीपक पवार, समीर पवार,दिलीप पवार, सचिन पवार, सुमेध पवार संतोष पवार,महेश पवार, आर्यन पवार,नितेश पवार,तेजस पवार, निकेश पवार,प्रताप पवार, जेष्ठ मार्गदर्शक महादेव पवार तसेच अष्टांगिक महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता पवार, दामिनी पवार, सरिता पवार,वैशाली पवार, मनिषा पवार,प्रीती पवार, दीपिका पवार, ज्येष्ठ महिलांमध्ये विजया पवार,वंदना पवार, मायावती पवार या सर्वांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सूत्रसंचालन लेखक राज पवार यांनी केले. त्रिरत्न बुद्ध विहारासाठी १० खुर्च्या धम्मदान मनिषा महादेव पवार यांच्याकडून देण्यात आल्या.सायंकाळी भोजनदान नंतर आंभिरा कलामंच मासू सचिन पवार आणि सहकारी यांचा कव्वालीचा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम अतिशय चांगल्या वातावरणात पार पडला

पत्रकार – राज पवार
दिनांक – ६/१०/२०२५

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात