द नेव्हल अकाऊंट को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड
मुंबई प्रविणभाऊ पवार
नौसेना कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या द नेव्हल अकौंट्स को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली असता या निवडणुकी नंतर नौसेना कामगारांच्या या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून श्री अविनाश महीपती पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीनुकीनंतर अविनाश पाटील त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सहकार भारती मुंबईचे संभाजी भोसले व कोल्हापूर शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान मुंबई चे भीमराव पाटील, त्यांचे सहकारी व श्लोक पतपेढीचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, सल्लागार रामभाऊ माने, पांडुरंग पाटील यांनी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.
अविनाश पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र असून श्लोक पतपेढीचे ते संस्थापक असून मुंबईत विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातून सहकार चळवळीत त्यांचं चांगले समाजकार्य चालू आहे.














