छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक मोर्चा; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर :
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चाचे आयोजन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकातून गुलमंडी चौकापर्यंत हा मोर्चा निघाला.
या मोर्चात हाती भगवे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन शेतकरी व शिवसैनिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदत पोहोचलेली नाही, असा ठाकरेंचा आरोप आहे.
शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत, आणि पीक विमा योजनेचा लाभ सर्वांना मिळावा — या प्रमुख मागण्यांसह मोर्चा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदी नेतेही या मोर्चात सहभागी झाले.
हा मोर्चा फक्त मागण्यांपुरता मर्यादित नसून, मराठवाड्यातील शिवसेनेचे राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणूनही पाहिला जात आहे. गुलमंडी चौकात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावर जोरदार टीका केली.
📍#UddhavThackeray #ShivSenaUBT #HambardaMorcha #ChhatrapatiSambhajinagar #ShetiAndolan #ratnagirivartahar
















