📰 गीतांजली गोसावीचा कराटेमध्ये उत्कृष्ट यश – माढा तालुक्यात गौरवाने सत्कार
🎖️ जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक, तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे यश तिने मिळवले
माढा (प्रतिनिधी) :
तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील गवळेवाडीच्या शंकर हरिभाऊ गोसावी यांची कन्या गीतांजली गोसावी हिने इयत्ता दहावी तायक्वांडो कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचा श्री. आप्पासाहेब गवळी (प्रहार शेतकरी संघटना, माढा तालुकाध्यक्ष) तसेच समाजसेवक धनाजी जाधव व उद्योजक धनाजी गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गीतांजलीने दाखवलेल्या परिश्रम व चिकाटीबद्दल गावकऱ्यांत अभिमानाचे वातावरण असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बातमी ~नंदकुमार बगाडे पाटील
#️⃣ #माढा #सोलापूर #तायक्वांडो #कराटे #गीतांजलीगोसावी #प्रहारशेतकरीसंघटना #क्रीडायश #गौरवसोहळा
📸न















