चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी!

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी!

महायुती झाली नाही तरी पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीस सज्ज — आमदार शेखर निकम

चिपळूण (प्रतिनिधी):

चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्ट मत नोंदवले की, महायुतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा; मात्र युती न झाल्यास पक्ष स्वबळावर लढण्यास पूर्ण तयार आहे.

बैठकीदरम्यान आमदार शेखर निकम म्हणाले, “इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जाणार असून यासाठी एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येईल. या बोर्डाचे प्रमुख प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील. नगर परिषदेच्या विकासकामांचा विचार केला तर परिषद ताब्यात घेण्यात पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही.”

बैठकीच्या सुरुवातीला बँकेचे चेअरमन संजयशेठ रेडीज आणि इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही एकमताने पारित करण्यात आला.

यानंतर मार्गदर्शन करताना आमदार निकम यांनी सांगितले की, “बॅनर लावून पक्ष मोठा होत नाही; घराघरांत संपर्क साधल्यानेच जनतेचा विश्वास जिंकता येतो.”

तर प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सांगितले की, “मरगळ झटकून पेटून उठावे, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्ष नक्कीच विजय मिळवेल.”

तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी नमूद केले की, “या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने आणि झटून काम केल्यास नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे शक्य आहे.”

बैठकीत प्रांतिक सरचिटणीस जयद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, कार्याध्यक्ष उदय ओतारी (सूत्रसंचालन), तसेच अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

चिपळूण नगर परिषदेतील १४ प्रभागांचा सविस्तर आढावा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला.

बैठकीस पूजा निकम, निलेश कदम, रियाना बिजले, जाकिरभाई शेकासन, रफिकभाई सुर्वे, सलीमभाई पालोजी, आदित्य देशपांडे, किशोर रेडीज, मनोज जाधव, सचिन पाटेकर, सचिन साळविलकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, फैरोजा मोडक, विनायक पवार, डॉ. राकेश चाळके, दिशाताई दाभोळकर, योगेश पवार, बिलाव पालकर, विशाल जाणवलकर, नसरिन खडस, संदीप चिपळूणकर, खालीद दाभोलकर, बरकत पाते, इम्रान खतीब, अनिकेत ल्हाद यादव, वैभव रेडीज यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

🏷️ हॅशटॅग्स:

#चिपळूणनगरपरिषद #राष्ट्रवादीकाँग्रेस #शेखरनिकम #चिपळूणराजकारण #RatnagiriVartahar #KonkanPolitics #ChiplunNews

📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला