📰 विरार येथे श्री स्वामी समर्थ सेवा व संतोष अबगुल प्रतिष्ठान तर्फे भव्यदिव्य रक्तदान शिबीर संपन्न
असंख्य रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; श्री स्वामी समर्थ माऊलींच्या आशीर्वादाने उपक्रम यशस्वी

विरार (प्रतिनिधी):
रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ सेवा, शनि मंदिर, गासकोपरी (विरार पूर्व) आणि संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर चिंतामणी हॉल, समीक्षा कॅटरेस, हरिगंगा मार्केट, रिक्षा स्टॅन्डलगत, फुलपाडा, विरार (पूर्व) येथे पार पडले.
संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत अमूल्य रक्तदान केले. श्री स्वामी समर्थ सेवा माऊलींनी देखील रक्तदान करून समाजकार्यास हातभार लावला. रक्तदात्यांचा गौरव म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी उपक्रमासाठी श्री विलास कांबळे माऊली, श्री सुनील पानगले माऊली, श्री भरत हुमणे माऊली, श्री निलेश कुलये माऊली आदींचे विशेष सहकार्य लाभले. भक्तिमय वातावरणात आणि आनंदीआनंद भावनेत हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले.
📍 विरार – फुलपाडा
✍️ सचिन कुळये
—
🩸 हॅशटॅग्स:
#विरार #रक्तदानशिबीर #श्रीस्वामीसमर्थ #संतोषअबगुलप्रतिष्ठान #समाजकार्य #फुलपाडा #स्वयंस्फूर्तरक्तदान #RatnagiriVartahar
–















