गुहागर पंचायत समितीच्या १० गणाचे आरक्षण जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर पंचायत समितीच्या १० गणाचे आरक्षण जाहीर

आबलोली (संदेश कदम)
गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच गुहागर पंचायत समिती सभागृह येथे पार पडला.या पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत मध्ये पाचेरी सडा पंचायत समिती गण मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, शीर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, असगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, कोंड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित, पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. अनेक पंचायत समिती गणांमध्ये मध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सुरू होती,तर पंचायत समिती गण मध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. असगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षाना महिलांची शोधाशोध करावी लागेल हे निश्चित आहे. तर काही ठिकाणी सदस्य पदांसाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंड कारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित असून आतापासूनच इच्छुक उमेदवार पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे.गुहागर पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी विविध पक्षातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते. शेवटी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सर्व नागरिकांच्या वतीने पत्रकार निसार खान यांनी या आरक्षण सोडत कार्यक्रमाचे गुहागर महसूल विभागाने योग्य नियोजन केल्याने आभार मानले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला