मराठा महासंघ मुंबई विभाग जम्बे कार्यकारिणी जाहीर मुंबई अध्यक्षपदी रुपेश मालूसरे
मुंबई प्रविणभाऊ पवार
मुंबई उपरोक्त संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकी निर्णयानुसार मुंबई, जिल्हा व तालुकास्तरावर नियुक्ती करण्याचे आपण काम करण्यात आले. दि. १२ सप्टेंबर २०२५ झालेल्या बैठकीत मुंबई, जिल्हा व तालुका स्तरावरील काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
रुपेश मालूसरे- मुंबई अध्यक्ष, एड.धर्मराज जाधव -महामुंबई अध्यक्ष, शंकर मोहिते- उपाध्यक्ष, प्रताप शिर्के -उपाध्यक्ष, अशोक देसाई -उपाध्यक्ष, महेंद्र तावडे -उपाध्यक्ष, संतोष साळवी- उपाध्यक्ष, सुजय पाटील – उपाध्यक्ष, भालचंद्र धुरी – सचिव, भालचंद्र दळवी -सचिव, संदिप देसाई- सचिव, प्रकाश म्हाब्दी -कोषाध्यक्ष, संतोष जाधव -सहसचिव, संजय दळवी -सहसचिव, सुधीर दळवी – सहसचिव, स्मिता साळवी मुंबई महिला अध्यक्षा, सुभाष बामणे मुंबई शैक्षणिक प्रमुख, एड. रघुनाथ गावडे- मुंबई लिगल प्रमुख पदी नियुक्ती यांची करण्यात आली
तसेच मुंबई च्या सहा जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे अजित कदम- दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष, सचिन शिंदे- दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष, सतिश जाधव- उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष, संतोष शिंदे- उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष, पोपट मांढरे -उतर मुंबई जिल्हाध्यक्ष, सचिन निकम- इशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर मुंबईतील तालुका प्रमुख पदी काही नियुक्त्या करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे सचिन पवार वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष, सुरेश शिंदे विलेपार्ले तालुका- अध्यक्ष, संदेश भोसले – चारकोप तालुका अध्यक्ष, दिलीप घोरपडे भांडूप तालुका अध्यक्ष, अनिकेत घोडेकर मुलुंड तालुका अध्यक्ष, विकास भोसले चेंबूर तालुका अध्यक्ष, अजित मोरे अनुशक्ती नगर तालुका अध्यक्ष, प्रकाश प्रभु सायन धारावी तालुका अध्यक्ष अशी ही मुंबई जब्बो कार्यकारिणी आहे
मुंबई रुपेश मालूसरे यांनी सांगितले की, आतापर्यंत ज्या समाज बांधवांच्या नियुक्ती झाल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या सहीनीशी नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, ज्या नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकार्यांनी आपण राहत असलेल्या विभागात अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजकार्य सुरू करावे.
तसेच आणखी काही नियुक्त्या नियोजित असून लवकरच म्हणजे दिपावली नंतर त्यावर चर्चा होऊन सदर नियुक्त्या अंतिम स्वरूपात आणण्यात येतील. मुंबई अध्यक्षांनी सर्व बांधवांना येणाऱ्या दिपावली सणाच्या खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत.














