धनंजय भाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय भाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी

गुहागर (प्रतिनीधी)
हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजय भाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व 35 ते 40 गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही 4 जे.सी.बी. व 2 पोकळलेंड ने घर पाडण्यास सुरुवात केली. घरामध्ये 90 वर्षाची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते.आलेल्या गुंडांनी घरातील महिलांना व 14 वर्ष मुलीला शस्त्रांचा धाक दाखवून छातीला, हाताला व कपड्यांना धरून बाहेर ओढत आणले तिचा विनयभंग केला. आणि वृद्ध व्यक्तीस घरातच ठेवून घर पाडण्यास सुरुवात केली.
या प्रकारचा भीषण त्रास घरातील लोकांना देत असताना अडविण्यासाठी गेले असता. महेश खाडे या व्यक्तीने आम्हीं काहीही करू तुम्हांला काय करायचं असे म्हटले तेव्हा घरातील लोकांनी 112 या क्रमांकावर संपर्क केल्यामुळे पोलीस संबंधित ठिकाणी आले. परंतू तिथे त्यांनी पूर्णपणे एकतर्फी व बघ्याची भूमिका घेतली. आत 90 वर्षीय वृद्ध आहे.हा प्रकार थांबवा असे सांगून देखील पोलिसांनी ते न थांबवता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असा सल्ला दिला. व घरातील काही मुले घर पाडणार्यांना विरोध करताहेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून पोलिसांनी त्यांना गाडीत बसून ठेवले.
मुळात कोणताही प्रशासकीय पद्धतीचा वापर न करता घरावर अश्या प्रकारचा दरोडा टाकण्याचा प्रकार चालू असताना पोलीस प्रशासनाने ते थांबविले का नाही? पोलीस प्रशासनाच्या या एकतर्फी भूमिकेमुळे त्या घरातील लोकांना भीषण त्रास सहन करावा लागला. तरी वरील सर्व प्रकार लक्षात घेऊन क्रूर मनोवृत्तीच्या विलास परमार, महेश खाडे सोबत 35 ते 40 गुंड यांचेवर दरोडा, घरफोडी, मारहाण अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व तिथे उपस्थित पोलीस अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांची कसून चौकशी व्हावी अशी नम्रविनंती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मिनेश अरुण कदम, गौरव पावसकर, सुजित नाईक, अभिमाने, सुशील कदम, जोशी सर, स्वयंम नायर, शैलेश बेर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात