वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांचा सत्कार
गुहागर– तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेला केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी वेलदूर नवनगर मराठी शाळेतील विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. शाळेमध्ये प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच शाळेच्या पटांगणामध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मिशन लोकशाही ,इस्रो नासा, आरटीएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा या स्पर्धा परीक्षांचा त्यांनी आढावा घेतला. स्पर्धा परीक्षेत शाळेने नेत्रदीपक सुयश प्राप्त करावे व पालक सहभागातून शैक्षणिक गुणवत्ता विकास साधावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळा स्तरावर त्यांचा सत्कार करण्यात आला .त्यावेळी मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, पदवीधर विषय शिक्षक निलेश पाटील, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.















