सुरळ बोर्या फाटा येथे राजश्री जनसेवा मेडिकलचे उदघाटन उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील सुरळ बोर्या फाटा येथे राजश्री जनसेवा मेडिकल (केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट)
चे उदघाटन रविवारी संत निरंकारी मिशनचे गुहागर तालुका मुखी दत्तात्रय किंजले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सद्गुरुमाता सुदिक्षा सविंदरजी यांची अपार कृपा आणि ब्रम्हनिष्ठ संताच्या आशिर्वादाने आग्रे कुटुंबीय नवीन व्यवसायमध्ये पदार्पण करत आहोत. या कुटुंबीयांना अनेक मान्यवर तसेच सुरळ परिसरातील सर्व नागरिक त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशनचे सदस्य यांनी येऊन शुभेच्छा दिल्या. तरी या उदघाटन सोहळ्यासाठी यशवंत दवंडे, मंगेश बारगोडे, दिनेश रांगळे निलेश सुर्वे. मंगेश रांगले. श्रीकांत मोरे. लक्ष्मण शिगवण दिनेश बागकर. सचिन ओक. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर तसेच नागरिकांचे सिताराम पांडूरंग आग्रे,
रविंद्र पांडूरंग आग्रे,दिनेश पांडूरंग आग्रे व आग्रे कुटुंबीय यांनी आभार मानले.
















