मराठा महासंघ वांद्रे (प) तालुकाध्यक्ष नितीन सुखदरे व सरचिटणीस चंद्रकांत पोटे यांची नियुक्ती
मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सरचिटणीस प्रमोदराव जाधव, कोषाध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या मुंबई विभागीय कार्यरत पदाधिकारी
याच संघटनेच्या वतीने मुंबई विभागीय पदाधिकारी नियुक्ती केल्या आहेत, त्याच प्रमाणे मुंबई चे सहा जिल्हाध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत, सद्या मुंबईतील ३६ तालुका अध्यक्ष व पदाधिकारी नियुक्ती करण्याचे कामकाज हाती घेतले आहे. यालाच अनुसरून वांद्रे पश्चिम तालुकाध्यक्ष व पदाधिकारी नियुक्तीती घोषणा करण्यात आल्या
वांद्रे पश्चिम तालुका अध्यक्ष व पदाधिकारी पुढीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आले आहेत. नितीन सुखदरे- अध्यक्ष, चंद्रकांत पोटे- सरचिटणीस, प्रसाद जाधव -कोषाध्यक्ष, दशरद कदम-उपाध्यक्ष, दिलीप बामणे- उपाध्यक्ष, संजय कदम- उपाध्यक्ष, प्रकाश शेडगे-उपाध्यक्ष, संतोष जगताप -चिटणीस, प्रदिप सुखदरे- चिटणीस, अनिल कदम-चिटणीस, सागर शेडगे- चिटणीस यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्ष रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांच्या वतीने करण्यात आल्या.
लवकरच मुंबई स्तरावरील अनेक तालुकाध्यक्ष व अनेक पदाधिकारी नियुक्ती करण्याचे कामकाज चालू करण्यात आले आले. महासंघात जो मराठा समाज बांधव सामिल होण्यासाठी इच्छुक असेल त्यांचे स्वागत! सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे मनःपुर्वक अभिनंदन















