स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीतुन लढणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीतुन लढणार

जिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार निवडूण आणा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

 

महाड येथे प्रचंड पावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाड ( संदेश कदम)

महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे.ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदास आठवले यांनी केले.

महाड येथे चांदे मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या 69व्या वर्धापनदिनानिमित्त आयेजित जाहिर सभेत नाम.रामदास आठवले बोलत होते.प्रंचड मुसळधार पाऊस महाड येथे कोसळत असताना या भरपावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.परिवर्तन कला महासंघाच्या गायकांनी भिमगीते सादर केली.ती भिमगीते आणि केंद्रीय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले यांचे भाषण भरपावसात श्रोत्यांनी ऐकले.यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा उत्साह पावसारखा ओसंडून वाहत होता.

राज्यभरातून रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते महाड शहरात आले होते.रिपाइं च्या वर्धापन दिना निमित्त महाड शहर हे रिपाइं च्या निळ्या झेंड्यांनी निळे निळे झाले होते.सभेच्या पुर्वी नाम.रामदास आठवले यांनी ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

महाड हे शहर आंबेडकरी चळवळीची क्रांतिभूमी प्रेरणाभुमी आहे. या भुमीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा 69 वा वर्धापनदिन आयोजित केल्याबद्दल सर्वांनी नाम.रामदास आठवले यांचे अभिनंदन केले.

 

यावेळी विचार मंचावर राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री नाम. भरतशेठ गोगावले उपस्थित होते.नाम.भरतशेठ गोगावले यांनी नाम.रामदास आठवल यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.

 

येत्या 20 मार्च 2027 मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीला 100 वर्ष पुर्ण होत आहेत.त्या निमित्त चवदार तळे आणि महाड शहारातील क्रांतीस्तंभ सर्व क्रांतीभुमी चे सौंदर्यीकरण;विकास कामे करण्यात येतील.अमृतसर गोल्डन टेम्पल च्या तलावाच्या धरतीवर चवदार तळ्याचे जल शुध्दीकरणाचा प्रकल्प उभारण्यात येईल असे नाम. भरतशेठ गोगावले यांनी जाहीर केले.

 

येत्या 2027 मध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पुर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचा भव्य सोहळा महाड येथे साजरा करण्यात येईल त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने भरीव निधी आणुन महाड चवदार तळे क्रांतिभूमी असलेल्या या ऐतिहासिक महाड शहराचे रुपडे पालटण्यात येईल असे नाम.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 

राज्य भरातुन आलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भरपावसात सभा ऐकल्याबद्दल नाम.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याचे अभिनंदन केले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवली पाहिजे.त्यासाठी केवळ बौध्दवाड्यांमध्ये ; बौध्द वस्ती मध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा नको,तर सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन गावागावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन केली पाहिजे.गावागावत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकला पाहिजे.सर्व समाजाला सोबत घेतले पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एका जाती धर्माचा पक्ष नसुन सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे.सर्व जाती धर्मीयांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे आवाहान ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले. यावेळी सौ. सीमाताई आठवले आणि त्यांचे पुत्र जीत आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइं चे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सूत्रसंचालन प्रीतम रुके, गौतम सोनवणे; यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि संयोजन कोकण प्रदेश अध्यक्ष,रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल सोनावले; युवा आघाडी राज्य अध्यक्ष पप्पू कागदे,

परशुराम वाडेक,रमेश मकासरे, काका खांबलकर, मिलिंद शेळके, सुरेश बार्शिंग,मुंबई प्रदेशअध्यक्ष सिद्धार्थ कासारे,मुंबई प्रदेश महासचिव -विवेक पवार,सचिन कासारे,अजित रणदिवे, ॲड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, नैना वैराट ;स्वप्नाली जाधव, निषाद बशीर,अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे,सूर्यकांत वाघमारे, उत्तमदादा कांबळे, श्यामधर दुबे, प्रा.विजय मोरे, सिद्राम ओव्हाळ,तुषार कांबळे,आदी. अनेक मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound