माझी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश
( मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले स्वागत)
मुंबई प्रतिनिधी – प्रविणभाऊ पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, खासदार श्री. नारायण राणे, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली आज वांद्रे पूर्व माझी आमदार तृप्ती बाळा सावंत यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
तृप्ती सावंत यांच्या सोबत आपले कार्यकर्ते व पदाधिकारी मा. महामंत्री विनोद पांडे, मा.अध्यक्ष उ. भा. पो. आनंदपाल त्रिपाठी, मा. महामंत्री शैलेंद्र मिश्रा, मा. उपाध्यक्ष वैशाली जाधव, दिपक मडिक, चंद्रिका तिवारी यांचे मुंबई अध्यक्षानी स्वागत केले.
या प्रसंगी सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष श्री. पवनकुमार त्रिपाठी, मुंबई चिटणीस महेश पारकर, जिल्हा सचिव रुपेश मालुसरे, जिल्हा सदस्य प्रवीण घाडगे, युवक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुबे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















