गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल

जागृत मतदारांची अपेक्षा – ॲड. सुप्रिया वाघदरे देतील गुहागरच्या विकासाला नवी दिशा.

गुहागर. ता.१४ – (सुजित सुर्वे~पडवे) -नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून मात्र मागील चार दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आज नगराध्यक्ष पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, हा अर्ज एका महिला उमेदवाराने दाखल केल्याने गुहागर नगरपंचायतीत महिला नेतृत्वाची नवी परंपरा सुरू होत असल्याचे चित्र आहे.

आज अपक्ष उमेदवार म्हणून  नगराध्यक्ष पदासाठी ॲड. सुप्रिया वाघदरे यांनी आपला अर्ज सादर केला. हा पहिला अर्ज असल्याची माहिती गुहागर चे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली.

महिला राखीव पद – पक्षांचे गणित गुंतागुंतीचेच

या निवडणुकीत नगराध्यक्ष पद महिला सर्वसाधारण राखीव असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना योग्य आणि   सक्षम महिला उमेदवाराचा शोध लागत नाहीय की काय?. निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांनी मोर्चेबांधणीला गती दिली होती. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने आपल्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे “पक्ष नक्की कोणाला उमेदवारी देणार?” यावर गुहागर शहरात चर्चा रंगू लागली आहे.

उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि व्यावसायिक उमेदवाराचा प्रवेश

अडचणीच्या पार्श्वभूमीवर न ॲड. सुप्रिया वाघदरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मोठं राजकीय समीकरणच बदलून टाकलं आहे. त्या कायद्याच्या क्षेत्रातील अनुभवी, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या महिला म्हणून गुहागरमध्ये ओळखल्या जातात.

गुहागर शहरातील अनेक जागृत मतदारांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः शहरातील मूलभूत विकासकामांवर त्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मतदारांच्या अपेक्षा – शहर विकासाची नवी दिशा

गुहागर शहरातील नागरिकांनान ॲड. सुप्रिया वाघदरे यांच्याकडून खालील महत्त्वाच्या प्रश्नांवर काम होईल अशी आशा आहे :

शहरातील प्राथमिक गरजा पूर्ण करणे

मुख्य रस्ते व आंतरिक रस्त्यांचे सुधारणा कामे

पर्यटन विकासाला गती – गुहागर पर्यटन स्थळांची ओळख वाढवणे

महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी उपक्रम

तरुणांसाठी रोजगार संधी, बेरोजगारीवरील उपाययोजना

जागृत मतदारांच्या या अपेक्षांमुळे गुहागर शहरातील निवडणूक आणखी रंगात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पक्ष उमेदवार जाहीर करणार का?

सर्वसाधारण महिला राखीव पदामुळे पक्षांची उमेदवार निवड प्रक्रिया गुंतागुंतीची झाली असून अद्याप नामनिर्देशित उमेदवार जाहीर झालेले नाहीत. पुढील काही दिवसांत पक्ष कोणाला संधी देणार आणि या स्पर्धेत कोण बाजी मारणार, याकडे गुहागरकरांचे लक्ष लागले आ

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात