संविधाना मुळेच समता, स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुतेचा अधिकार मिळाला – प्रितम रुके

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संविधाना मुळेच समता, स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुतेचा अधिकार मिळाला – प्रितम रुके

दापोलीत संविधान दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) 

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम लोकशाही व्यवस्थेचा पाया असून, त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार मिळाला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन (आठवले)पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी केले.

दापोली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, “संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशाची लोकशाही अधिक मजबूत बनली आहे. एक मताचा समान अधिकार या तत्वामुळे वंचित, पीडित, शोषित, महिला आणि बहुजन समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. संविधानाची जपणूक व संरक्षण करणे हे अखंड भारतीयांचे कर्तव्य आहे.”

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अमर शांताई अर्जुन हजारे यांनी भारतीय संविधानाची प्रेरणादायी यात्रा आणि सामाजिक न्यायाची दिशा यावर मार्मिक विवेचन केले. त्यांनी संविधानातील मूल्ये फक्त वाचनापुरती राहू नयेत, ती आचरणात उतरली पाहिजेत, असे सांगत उपस्थितांना संदेश दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश रुके यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा अहिल्या नगर कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल जाधव, किरण गमरे, संजय तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन जितेंद्र जाधव यांनी मानले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, शिवसेना तालुकाप्रमुख उमेश राजे, माजी समाजकल्याण सभापती भगवानजी घाडगे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. दापोलीत लोकशाही मूल्यांची पुनर्र ‌‌‌प्रतिज्ञा देणारा हा कार्यक्रम सर्वपक्षीय ऐक्याचे प्रतीक ठरला.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात