जिजाऊ संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोफत डेमो पोलीस भरती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*जिजाऊ संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोफत डेमो पोलीस भरती

आबलोली (संदेश कदम)

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरतीचे आयोजन देवरुख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात दिनांक 30 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 06 :००वाजता घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या 15,000 पेक्षा जास्त जागांच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर या डेमो भरतीचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे. त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवती पोलीस प्रशासनात रुजू होतील या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे साहेबांनी या डेमो भरतीचे आयोजन केले आहे. या डेमो पोलीस भरतीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. कालपर्यंत या डेमो भरतीसाठी 1200 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झालेली आहे.

जिजाऊ संस्थेच्या अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत गेल्या पंधरा वर्षात जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत.

जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे एक निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे. याच धर्तीवर रत्नागिरी शहरात 100 विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सांबरे साहेबांचा मानस आहे. या डेमो पोलीस भरतीत पहिल्या 70 विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहेत. याशिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी,लांजा, सापुचेतळे, देवरुख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत.

जिजाऊ संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील 12 वी पास असलेल्या 18 ते 28 वयोगटातील युवक युवतींना या डेमो भरतीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे.

अधिक माहितीसाठी श्री.केदार चव्हाण (सचिव – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र) 7208612222

ॲड. महेंद्र मांडवकर ( जिल्हाध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा ,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र)
94232 92575 यांचेशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन जिजाऊ संस्थे मार्फत करण्यात आले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात