आंदोलनासाठी नागपूर येथे जाणाऱ्या उमेद अभियानाच्या महिलांना संवेदना जागृती संघाकडून पाठिंबा व मदत
राजापुर ~पुरुषोत्तम खाम्बल प्रतिनिधि
आज रोजी राजापूर तालुक्यातून सुमारे 40 पेक्षा जास्त उमेद अभियानाच्या महिला नागपूर येथे अधिवेशन काळात त्यांच्या न्याय मागण्या अध्याप मान्य न झाल्याने आंदोलनासाठी रवाना झाल्या,
यावेळी त्यांनी निरोप देण्यासाठी व पाठिंबा दर्शवण्यासाठी संवेदना जागृती संघ राजापूर अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल व सचिव अद्वैत अभ्यंकर राजापूर तालुकाध्यक्ष समीर शिरवळकर, राजापूर शहराध्यक्ष जगदीश नाचणकर आदी उपस्थित होते लांबचा प्रवास व महिला प्रवासी लक्षात घेऊन संघाने त्यांना पाण्याच्या बाटल्या मदत रुपी भेट होऊ दिल्या उमेद अभियान राजापूरच्या सर्व महिलांना व पदाधिकारी यांनी संघाचे आभार मानले















