पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘पारिजात भित्तिपत्रक’ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘पारिजात भित्तिपत्रक’ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वांड:मय मंडळ व मराठी विभागाच्यावतीने प्र. प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांच्या उपस्थितीत मा. प्रा. मनाली बावधनकर यांचे हस्ते पारिजात भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कु. साक्षी पवार व सहकारी यांनी ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत गाऊन ईशस्तवन म्हटले.   महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या हस्ते प्रमुख वक्ते मा. प्रा. मनाली बावधनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना कु. वसुंधरा रोहिलकर हीने आजच्या आधुनिक युगामध्ये वाचन व लेखन संस्कृती लोप पावत असल्याचे सांगून आजच्या विद्यार्थ्यानमध्ये वाचन व लेखन संस्कृती वाढावी, रुजावी भावी विद्यार्थी सुसंस्कारीत व्हावा. त्यातूनच एखादा लेखक, साहित्यिक घडावा अशी भूमिका वांड.मय मंडळाची असल्याचे सांगितले. तशी विद्यार्थ्यांकडून आशा व अपेक्षा वांड:मय मंडळाची असल्याचे म्हटले.

मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या मा. प्रा. मनाली बावधनकर यांचा परिचय करून दिला.

यावेळी मा. प्रा. मनाली बावधनकर यांनी आपल्या प्रमुख मागर्दर्शनातून भित्तिपत्रक म्हणजे बालपणातील रुजलेला आरसा, मनाचा ठाव घेणारे पत्रक असते असे म्हटले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून विद्यार्थ्यांनी महावि‌द्यालयीन जीवनात सामाजिक भान जपत समाजाचे संवेदनशील पद्धत्तीने निरीक्षण करून विविध प्रकारचे लेखन केले पाहिजेत. त्यासाठी साहित्यिकाची भाषा म्हणजे समुद्रातून एखादा मोती निवडावा तशी साहित्यिक भाषेचा वापर करत असतो. इंग्रजीतील लव या एकाच शब्दासाठी मराठीतील प्रेम, माया, जिव्हाळा, अनुलोप, स्नेह असे विविध प्रकारचे कितीतरी शब्द आहेत. त्याचा उपयोग साहित्यिक कितीतरी कुशलतेने करत असतो. अशा प्रकारच्या विविध उदाहरणांतून त्यांनी सांगितले. पारिजात म्हणजे प्राजक्त. आपल्या मनातील विचारांचा लेखना‌द्वारे पारिजातकाच्या फुलांसारखा सडा पडावा असे भरभरून आपण लेखन करावे. अशी आशा व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांनी आपल्या मनोगतातून वांड:मय मंडळाच्या कार्याचे कौतुक करून महावि‌द्यालयात विद्यार्थ्यांनसाठी असेच विविध उपक्रम राबवावेत त्यासाठी महावि‌द्यालयाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. तसेच वांड.मय मंडळाच्या पुढील कार्यास व वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल आग्रे व वांड:मय मंडळाचे अध्यक्ष कु. अदिती कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाला डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. कांचन कदम, प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, महाविद्यालयाचा वि‌द्यार्थी सचिव साहिल आग्रे, वांड.मय मंडळाचे अध्यक्ष – कु. अदिती कुलकर्णी, उपाध्यक्ष – रंजित पाष्टे, सचिव – निखिल टानकर व वांड. मय मंडळाचे सर्व पदाधिकारी, मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थ्ति होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वांड:मय मंडळाची जनसंपर्क अधिकारी कु. नुपूर कारेकर हीने केले तर उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार वांड:मय मंडळाचे कोषाध्यक्ष कु. समृद्धी घाणेकर हीने मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात