तळवली ज्युनिअर काॅलेजमध्ये ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा.
तळवली (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दि. 11/12/2025 रोजी ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा केला.
तळवली ज्युनिअर काॅलेजचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विविध डे साजरा करतात. त्याप्रमाणे याही वर्षी दि.8 ते 12 डिसेंबर या काळात सलवार कुडता व साडी डे, ब्लॅक व्हाईट डे, फाॅर्मल ड्रेस डे, ट्रॅडिशनल डे असे विविध प्रकारचे डे चे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
शुक्रवार दि. 11/12/2025 रोजी ‘ट्रॅडिशनल डे’ उत्साहात साजरा केला त्यामध्ये कोकणची विशेष संस्कृती जपणारा शिमगोत्स,गणपती उत्सव तसेच आनंदी व उत्साही वातावरणातील लग्न सोहळा असे एकाहून एक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मार्गदर्शक प्रा.अमोल जड्याळ सर,प्रा.सौ.कांबळे मॅडम, प्रा.सौ.जड्याळ मॅडम, प्रा. कु.सावंत मॅडम या प्राध्यापकांच्या सहकार्याने हे सर्व कार्यक्रम उत्साहात साजरे केले. या सर्व कार्यक्रमामुळे ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. प्रत्येक विद्यार्थी या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत होता. त्यामुळे हे सर्व डेज यशस्वी रीत्या पार पडले. त्याबद्दल प्राचार्य श्री.एम.ए. थरकार सर यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन केले.















