राज्यस्तरीय स्पर्धेत संचिता वरवटकरची चमकदार कामगिरी; ब्राँझ पदकाची कमाई
रत्नागिरी प्रतिनिधी:- निलेश रहाटे
आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल, बालेवाडी, पुणे येथे झालेल्या 12 वर्षाखालील राज्यस्तरीय इंटर स्कूल चॅम्पियन वैयक्तिक मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात माध्यमिक विद्यालय भागशाळा वाटद खंडाळा येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी संचिता विनोद वरवटकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ पदकाची कमाई केली.
खेळाची विशेष आवड असलेली संचिता अत्यंत मेहनती व जिद्दी खेळाडू असून तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव व योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तिला शाळेचे क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव व पल्लवी बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी तिच्यात खेळाची आवड निर्माण केली असून आई-वडील दोघेही कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
संचिताने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक तसेच संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे














