विद्यार्थ्यांच्या करिअरच्या यशस्वी पूर्तीसाठी पालकांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची : माधव अंकलगे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या यशस्वी पूर्तीसाठी पालकांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची : माधव अंकलगे

रत्नागिरी प्रतिनिधी:- निलेश रहाटे

जाकादेवी : विद्यार्थी शिक्षण घेत असताना मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी स्वप्ने पाहतो. याच स्वप्नांच्या पूर्तीसाठी प्रत्येक विद्यार्थी, उपलब्ध साधन सामुग्री आणि सुविधा यांच्या माध्यमातून करिअर निश्चित करत असतो. त्या करिअरच्या पूर्णत्वासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या करिअरच्या बाबतीत सकारात्मक असणे आवश्यक असल्याचे मत व्याख्याते माधव अंकलगे यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी जिल्ह्यातील एम. फांऊंडेशन ठाणे संचलित वामन गोविंद पटवर्धन हायस्कूल पोचरी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन व्याख्यानप्रसंगी बोलत होते.
त्यांनी आपल्या व्याख्यानात पुढे सांगितले की, आजच्या प्रगत प्रसारमाध्यमांच्या काळात आजच्या विद्यार्थ्यांची प्रचंड कोंडी झाली असून, त्यातून त्यांना आधार देऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांत झेप घेण्यासाठी आवश्यक मानसिक सहकार्य पालकांनी देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या विकासात शाळेतील शिक्षक आपल्या परीने कार्य करत असतातच, मात्र त्यासोबतच पालकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी सतत सकारात्मक संवाद साधला पाहिजे. कारण आपले आई – वडील हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आदर्शवत असतात. त्यामुळे पालकांनी या वयात विद्यार्थ्यांना सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांनी देखील आपले शिकणे हे, आपल्यासाठी दिवसरात्र नि:स्वार्थी झटून स्वप्ने पाहणाऱ्या, पालकांसाठी समर्पित केले पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. एकदा संधी निघून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा वेळेत विचार करून त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
यावेळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. पानगले सर यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या कार्याच्या आढावा घेतला. तसेच आपले भविष्यातील नियोजन कसे असेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील शाळा असूनही शाळेच्या विकासात्मक बाबीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सचिव मा. लोकेश सागवेकर यांच्या हस्ते व्याख्याते माधव विश्वनाथ अंकलगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोचरी ग्रामपंचायतच्या सरपंच मा. भारती धामणे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक मा. पानगले सर यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात