रत्नागिरी भूषण पुरस्काराने दिशा महाराष्ट्राची या वाहिनीचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर सन्मानित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी भूषण पुरस्काराने दिशा महाराष्ट्राची या वाहिनीचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर सन्मानित

आबलोली (संदेश कदम)

विविध क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटवणारे, साहित्यिक, सामाजिक व्यक्तीमत्व, दिशा महाराष्ट्राची या युट्युब तसेच वेब पोर्टल चे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने संगमेश्वर येथे सन्मानित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला गावांच्या विकासाला गती देणारा उत्सव म्हणजेच कुणबी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. सुहास खंडागळे तसेच उदय गोताड हे होते. मुख्य निमंत्रक म्हणून मुझम्मील काझी, सुनील खंडागळे तसेच नितीन गोताड होते. करंबेले तर्फे देवळे, गोताडवाडी, ता. संगमेश्वर येथे सदर कार्यक्रम दि. १३ व १४ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने श्री. तुषार नेवरेकर यांना “रत्नागिरी भूषण २०२५” हा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी दिशा महाराष्ट्राची वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक तुषार नेवकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रत्नागिरी भूषण पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार मला ज्यांनी आत्तापर्यंत मदत केलेल्या, मार्गदर्शन केलेल्या ज्ञात, अज्ञात व्यक्तिमत्त्वांचा आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे समाजात अजून विविध क्षेत्रात काम करण्याची मला नक्कीच प्रेरणा प्राप्त झाली आहे. पुढील अनेक वर्ष आपण सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकार आदी. क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवून नवोदिकांना, त्यांच्या कामांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत राहणार असल्याचे तुषार नेवरेकर यांनी आवर्जून सांगितले

तुषार नेवरेकर यांना मिळालेल्या रत्नागिरी भूषण पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचेवर विविध राजकीय, धार्मिक, सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी यूट्यूबर रिल्स्टार कोकणी निखिल म्हणजेच निखिल सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, तसेच गावकर राजेश गोताड,माजी पोलिस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, बुधाजी खंडागळे,आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड,मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ.मंगेश कांगणे,अमित गमरे,नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव, स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात