पाचेरी सडा नं.1 शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
गुहागर – अबलोली
पाचेरी आगर केंद्राच्या केंद्र स्तर हिवाळी क्रीडा स्पर्धा दिनांक ११/१२/२०२५ ते १२/१२/२०२५ रोजी पाचेरी आगर गावी संपन्न झाल्या.या स्पर्धेत पाचेरी सडा नं.१ शाळेला सालाबादप्रमाणे याहीवर्षी आपला स्पर्धेतील दबदबा कायम ठेवत “सर्वोत्कृष्ट शाळा” पुरस्कार मिळाला.या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रीय प्रमुख मा. विश्वास खर्डे साहेब होते. पाचेरी सडा नं. १ शाळेने सांघिक तसेच वैयक्तीत खेळातही उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले गेले.
सांघिक क्रीडा प्रकारातील यश

1. कब्बडी मोठा गट मुली – विजेता
2. खो खो मोठा गट मुली – विजेता
3. कब्बडी लहान गट मुलगे – विजेता
4. खो खो लहान गट मुलगे – विजेता
5. क्रिकेट मोठा गट मुलगे – विजेता
6. कब्बडी मोठा गट मुलगे – उपविजेता
7. खो खो मोठा गट मुलगे – उपविजेता
8. लंगडी मोठा गट मुली – उपविजेता
9. लंगडी लहान गट मुली – उपविजेता
10. खो खो लहान गट मुली – उपविजेता
वैयक्तिक क्रीडा प्रकारात देखील शाळेने घवघवीत यश मिळवले. पाचेरी सडा नं.1 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले गेले. यासाठी विशेष मेहनत शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ सर , श्री. सचिन लबडे सर , श्री. आनंद मुळे सर यांनी घेतली. सर्व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले गेले.















