विरार – भातगाव एस. टी. बस सुरु करावी – गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांची परीवहन मंत्र्यांकडे मागणी
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांनी भातगाव, आवरे, आबलोली, मासू, पाचेरी, कोळवली, मोंभार, असोरे, या गावातील विरार, नालासोपारा, वसई, विरार, ठाणे, याठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या जनतेसाठी विरार – भातगाव ही विरार आगारची नवीन एस. टी.बस सुरु करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नाम. प्रतापजी सरनाईक आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागचे व्यवस्थापकीय संचालक महादेव कुसेकर यांना निवेदनद्वारे केली आहे, विरार – भातगाव एसटी बस सुरू होण्यासाठी मिलिंद चाचे हे प्रयत्नशील आहेत.
गेली 5 वर्ष मिलिंद चाचे हे गणपती उत्सव, होळी उत्सव साठी ज्यादा गाडी मंजूर करून घेतल्या आहेत, काही दिवसापूर्वी कुडली – अक्कलकोट ही बस ही मिलिंद चाचे यांच्या प्रयत्न मधून सुरु झाली होती, आणि आता त्यांनी विरार – भातगाव ही विरार डेपो ची बस ची मागणी केली आहे, आणि येत्या काही दिवसात ही बस, भातगाव, पाचेरी, मोबार, असोरे, कोळवली मासू आणि आजू बाजूच्या गावातील जनतेसाठी उपलब्ध होइल असे श्री. मिलिंद चाचे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे.
















