गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना जल्लोषात सुरुवात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना जल्लोषात सुरुवात

गुहागर ~

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती गुहागर गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पालपेणे वरदान हायस्कूल क्रीडा नगरीमध्ये अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सुरू झाल्या.क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय शेखर भिलारे साहेब यांनी दिप प्रज्वलन व प्रतिमापूजन केले.त्यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले .त्यावेळी गुहागरचे गटशिक्षण अधिकारी रायचंद गळवे साहेब, जनसेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विष्णू पालकर, शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र वळवी , विस्तार अधिकारी परवेज चिपळूणकर, केंद्रप्रमुख विश्वास खर्डे, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, केंद्रप्रमुख आरोही शिगवण ,पालपेणेचे सरपंच सौ योगिता पालकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्मिता माखजणकर ,मुख्याध्यापक हळबे सर, शिक्षक मोहिते सर ,अरविंद पालकर ,चंद्रकांत झगडे, कैलास शार्दुल, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, बीट स्तरावर विजयी झालेले सर्व संघातील खेळाडू ,मार्गदर्शक व शिक्षक ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी गटविकास अधिकारी भिलारे साहेब, गटशिक्षणाधिकारी गळवे साहेब व मान्यवर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी गळवे साहेब यांनी केले. गुहागर बीटाने यजमानपद स्वीकारून क्रीडा स्पर्धेचे अत्यंत उत्कृष्टरित्या नियोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर स्पर्धा नियोजनबद्ध रीतीने व नियमांचे पालन करून व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, खो-खो १०० मीटर धावणे, ५० मीटर धावणे ,थाळीफेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी , क्रिकेट इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे .अध्यक्ष स्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी भिलारे साहेब म्हणाले की खेळामध्ये संघभावना ही अत्यंत महत्त्वाची असते, खेळाडूमध्ये वैयक्तिक गुण कितीही उच्च दर्जाचे असले तरीसुद्धा इतरांची साथ जर मिळाली नाही तर संघ पराजित होतो, शेवटच्या क्षणापर्यंत सामना फिरविण्याची ताकद खेळाडूमध्ये असते.त्यामुळे त्यांनी संयम चिकाटी व जिद्द दाखवावी, जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे, जय पराजय पचवण्याची ताकद विद्यार्थी दशेपासून खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये येते, विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणाना शिक्षकांनी वाव द्यावा , तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत नियोजनबद्ध असे आयोजन केल्याबद्दल तालुक्यातील तमाम शिक्षकांना त्यांनी धन्यवाद दिले .त्यावेळी अत्यंत दिमाखदारपणे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन गटविकास अधिकारी भिलारे साहेब व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.क्रीडा ज्योतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व तालबद्धरित्या संचालन करण्यात आले.उद्घाटन सामन्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी भिलारे साहेब यांचे हस्ते करण्यात आले.तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शील्ड, भोजन ,बक्षिसे याकरिता अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ यांचे कडून महत्वपूर्ण योगदान देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात