गोरेगाव पुर्व येथे सावित्रीमाई जयंतीचे आयोजन
नवीमुंबई (मंगेश जाधव)
गोरेगाव पुर्व येथील विसावा नागरी निवारा जेष्ठ नागरिक संघ, प्लॉट क्र.६ येथे भारत देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त बहुजन महानायिका माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, पुज्यनिय माता भिमाई, त्यागमुर्ती माता रमाई आणि माता फातिमा शेख यांचा संयुवत जयंती कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठान (रजि.) या संस्थेच्या विद्यमाने आज शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौध्द संघर्ष समितीचे सदस्य निखिल जाधव हे उपस्थित असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुमन जाधव या स्विकारतील.त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष साक्षी काळे , सुत्रसंचालन विणा पवार, अंजली कांबळे तर आभार प्रदर्शन स्नेहा कोळवणकर आणि लता क्षीरसागर या करतील.
यावेळी कविता, गायन, भाषण व वेशभूषा असे महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यकार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठान कार्यकारणी, सदस्य व समस्त महिला मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
















