व्यापारी संघटना आबलोली यांच्यावतीने श्री.सत्यनारायण महापूजा निमित्त दि.११ रोजी आबलोली बाजारपेठ येथे विविध कार्यक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील व्यापारी संघटना आबलोली यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे. सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी १०:०० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद त्यानंतर दुपारी ०३:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता स्थानिक मंडळींचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर रात्री ०९:०० वाजता ज्येष्ठ व्यापारी यांच्या सत्कारांचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर रात्री १०:०० वाजता माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या मंडळाचा महिलांचा बहुरंगी, बहुढंगी नमानाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन व्यापारी संघटना आबलोली या संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश बाईत,उपाध्यक्ष विजय पागडे ,सेक्रेटरी शैलेश दिंडे, खजिनदार सुनील दाते आणि सर्व व्यापारी सदस्य व व्यापारी संघटना आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे















